
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। मंत्री अतुल सावे आणि माजी खासदार भागवत कराड यांच्यासह भारतीय जनसा पक्षाच्या नेत्यांनी ‘हर घर तिरंगा’ रॅली मार्गाची पाहणी केली. ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य ‘हर घर तिरंगा’ पायी रॅलीच्या अनुषंगाने रॅलीच्या मार्गाची व नियोजित स्थळांची पाहणी करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ ऑगस्ट रोजी ही भव्य पायी रॅली आयोजित करण्यात येणार आहे. रॅलीचा प्रारंभ संभाजी पेठ येथून होईल, तसेच क्रांती चौक येथील तिरंगा ध्वजस्थळी भव्य समारोप करण्यात येणार आहे. यावेळी रॅलीच्या मार्गासह वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता आणि आवश्यक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis