
नांदेड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिलोली नगरपालिकेला अखेर पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले असून, कल्पेश जाधव यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नगरपालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
बिलोलीला मागील सहा वर्षांत केवळ दोन वेळा अत्यल्प कालावधीसाठी मुख्याधिकारी लाभले होते. त्यानंतर तब्बल तीन वर्षांपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळालेला नव्हता. परिणामी शहरातील विकासकामांना खीळ बसली होती. आता पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्याची प्रतीक्षा संपली असून, कल्पेश जाधव यांनी आपल्या
कार्यकाळातील पहिला पदभार बिलोली येथे स्वीकारत सेवेला सुरवात केली आहे. प्रभारी मुख्याधिकारी बालाजी मिठेवाड यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. बिलोली शहराचा विकास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण यांना आपण प्रथम प्राधान्य देणार असल्याचे मनोगत कल्पेश जाधव यांनी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis