नऊ खरीप पिकांसाठी राज्यांतर्गत पीकस्पर्धा; विजेत्यांना ५० हजारांपर्यंत बक्षीस
पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ साठी नऊ खरीप पिकांची राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल य
pik veema


पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ साठी नऊ खरीप पिकांची राज्यांतर्गत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी शेतकऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

या पीकस्पर्धेत ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

सर्वसाधारण तसेच आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर पीकस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावरील विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

राज्यस्तरीय विजेत्यांना ५० हजारांचे बक्षीस

पीकस्पर्धेतील विजेत्यांना विविध स्तरांवर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

-

तालुकास्तर: प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार आणि तृतीय २ हजार रुपये.

-

जिल्हास्तर: प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार आणि तृतीय ५ हजार रुपये.

-

राज्यस्तर: प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार आणि तृतीय ३० हजार रुपये.

पीकस्पर्धेतील सहभाग, निकष आणि इतर अटींबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने पीकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande