छ. संभाजीनगर - रेशीम कोष बाजारपेठ इमारतीची विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। जालना जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना देत रेशीम क्षेत्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण रेशीम कोष बाजारपेठ इमारतीची विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार नारायण कुचे यांनी पाहणी केली. या महत्त्वपूर्ण प
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। जालना जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना देत रेशीम क्षेत्राच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण रेशीम कोष बाजारपेठ इमारतीची विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार नारायण कुचे यांनी पाहणी केली.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. या बाजारपेठेमुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या रेशीम कोषाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस निश्चितच हातभार लागणार आहे.

यावेळी इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि जालना जिल्ह्यातील रेशीम क्षेत्राचा विकास यासाठी शासन कटिबद्ध आहे. या प्रसंगी माजी. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, महानगर अध्यक्ष भास्कर आबा दानवे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande