मंत्री अतुल सावे यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावला
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे दुग्धविकास मंत्रीमंत्री अतुल सावे यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील निवासस्थानी तिरंगा फडकवण्यावत आला आहे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मंत्री अतुल सावे यांनी आपल्या निवासस्थानी सहकुटुंब तिरंगा ध्वज अभि
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे दुग्धविकास मंत्रीमंत्री अतुल सावे यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील निवासस्थानी तिरंगा फडकवण्यावत आला आहे

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मंत्री अतुल सावे यांनी आपल्या निवासस्थानी सहकुटुंब तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. देशभरात राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याप्रती सन्मानाची भावना वाढावी, या उद्देशाने हे अभियान राबविले जात आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावून राष्ट्राभिमान व्यक्त करावा, असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले. तिरंगा हा देशाच्या अभिमान, स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक असून प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रभक्ती असावी, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहनही करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande