नांदेड महापौर चषक स्पर्धांसाठी १० लाखांचा निधी
नांदेड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने ''महापौर चषक'' क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापौर कविता मुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या स्पर्धांच्या आयोजनासाठी १० लाख रुपयांचा निधी उ
नांदेड महापौर चषक स्पर्धांसाठी १० लाखांचा निधी


नांदेड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने 'महापौर चषक' क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापौर कविता मुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या स्पर्धांच्या आयोजनासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला

शिष्यवृत्ती योजनेमुळे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळून त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला चालना मिळेल, असा विश्वास ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बैठकीत नांदेडची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी विविध

खेळांना प्रोत्साहन, खेळाडूंना आवश्यक सुविधा आणि नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. यावेळी उपमहापौर उमेश पवळे, नगरसेविका मिनल पाटील, ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष बालाजी जोगदंड आणि कोषाध्यक्ष प्रा. जयपाल रेड्डी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande