रत्नागिरीची दैवज्ञ पतसंस्था आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी, 12 ऑगस्ट (हिं.स.) । अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद या १२० वर्षे जुन्या संस्थेने रत्नागिरीच्या दैवज्ञ पतसंस्थेला आदर्श संस्था म्हणून यावर्षीपासून सुरू केलेल्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. मुंबईतील समारंभात संस्थेचे अध्यक्ष विजय प
रत्नागिरीच्या दैवज्ञ पतसंस्थेला आदर्श पुरस्कार


रत्नागिरी, 12 ऑगस्ट (हिं.स.) । अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद या १२० वर्षे जुन्या संस्थेने रत्नागिरीच्या दैवज्ञ पतसंस्थेला आदर्श संस्था म्हणून यावर्षीपासून सुरू केलेल्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

मुंबईतील समारंभात संस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर, आनंद वीरकर, सौ. रत्ना आचरेकर, सौ. अंजली पेडणेकर,अनिल उपळेकर या सर्वांनी हा सन्मान समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या हस्ते स्वीकारला.

सहकार क्षेत्रामधील संस्थांसाठी यावर्षीपासूनच सुरू करण्यात आलेल्या पहिल्या सन्मानाने रत्नागिरीच्या संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच दैवज्ञ बांधवांमध्ये या संस्थेविषयीचा विश्वास वाढला आहे, असे. गौरवोद्गार समाजश्रेष्ठी डॉ. रत्नपारखी यांनी यावेळी काढले ,याप्रसंगी थोर समाजसेवक जगन्नाथ ऊर्फ नाना शंकर शेठ यांचे वंशज सुरेंद्र भाऊ शंकर शेठ हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

या सन्मानामुळे रत्नागिरीच्या दैवज्ञ पतसंस्थेच्या विश्वासार्हतेमध्ये वाढ झाली असून त्याचा परिणाम संस्थेमधील सर्व आर्थिक व्यवहार वाढण्यासाठी होणार, आहे असा विश्वास अध्यक्ष विजय पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande