नांदेड - सत्यगणपतीच्या चरणी बावीस लाखांचे दान
नांदेड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। दाभड (ता. अर्धापूर) येथील सत्यगणपती देवस्थानच्या दानपेट्यांतील रोख रक्कम, सोने व चांदीच्या वस्तूंची मोजणी करण्यात आली आहे. या मोजणीत २१ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम, तीन तोळे सोने आणि आठ किलो २०० ग्रॅम चांदी भाविकांनी
नांदेड - सत्यगणपतीच्या चरणी बावीस लाखांचे दान


नांदेड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। दाभड (ता. अर्धापूर) येथील सत्यगणपती देवस्थानच्या दानपेट्यांतील रोख रक्कम, सोने व चांदीच्या वस्तूंची मोजणी करण्यात आली आहे. या मोजणीत २१ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम, तीन तोळे सोने आणि आठ किलो २०० ग्रॅम चांदी भाविकांनी दान अर्पण केले. नांदेड-अर्धापूर मार्गावरील भोकरफाटा परिसरातील दाभड येथील सत्यगणपती देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

अधिक मास आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यापूर्वी दानपेट्यांची मोजणी करण्यात आली होती. यावेळी दानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. देवस्थानचे प्रशासक तथा तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे यांच्या निगराणीखाली ही मोजणी प्रक्रिया पार पडली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक बी.एस. आवचार व लिपिक भगवान केरुरे यांच्या उपस्थितीत धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार पारदर्शक पद्धतीने दानाची मोजणी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande