दरेकर-घेवारे यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी; रायगडच्या पत्रकारितेचा गौरव
रायगड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। : व्हॉईस ऑफ मीडिया (V.O.M. International Forum)च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांच्या पदग्रहण सोहळ्यासह एकदिवसीय कॅडर कॅम्प नुकताच परभणीत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्या
# ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या महाराष्ट्र कार्यकारणीत रायगडचा दबदबा; दरेकर, घेवारे यांची नियुक्ती  **परभणी :** व्हॉईस ऑफ मीडिया (V.O.M. International Forum)च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांच्या पदग्रहण सोहळ्यासह एकदिवसीय कॅडर कॅम्प परभणी येथील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील पत्रकार अभिजीत नारायण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी, तर संकेत घेवारे यांची महाराष्ट्र राज्य संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली.  कार्यक्रमाला राज्यभरातील पत्रकार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अभिजीत दरेकर आणि संकेत घेवारे यांना नियुक्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. दोन्ही पत्रकारांवर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविल्याने रायगडच्या पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.  अभिजीत दरेकर हे दैनिक धडक महाराष्ट्राचे मुख्य संपादक, तर संकेत घेवारे हे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांना सातत्याने प्रसिद्धी देत सामान्य नागरिकांचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात आले.  पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित राज्य पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांनी पदभार स्वीकारला. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांच्या समस्या शासनदरबारी मांडणे आणि पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी संघटनात्मक माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.  कॅडर कॅम्पमध्ये पत्रकार संघटनेची भूमिका, संघटनात्मक बांधणी, पत्रकारांच्या समस्या, पत्रकारांसाठी उपलब्ध सरकारी योजना आणि बदलत्या पत्रकारितेतील आव्हाने यावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे आवाहन पत्रकारांना करण्यात आले.  या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विशाल पाटील, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. दरेकर आणि घेवारे यांच्या निवडीबद्दल पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

रायगड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। : व्हॉईस ऑफ मीडिया (V.O.M. International Forum)च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांच्या पदग्रहण सोहळ्यासह एकदिवसीय कॅडर कॅम्प नुकताच परभणीत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील पत्रकार अभिजीत नारायण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी, तर संकेत घेवारे यांची महाराष्ट्र राज्य संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाला राज्यभरातील पत्रकार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अभिजीत दरेकर आणि संकेत घेवारे यांना नियुक्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. दोन्ही पत्रकारांवर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविल्याने रायगडच्या पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

अभिजीत दरेकर हे दैनिक धडक महाराष्ट्राचे मुख्य संपादक, तर संकेत घेवारे हे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांना सातत्याने प्रसिद्धी देत सामान्य नागरिकांचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात आले.

पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित राज्य पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस यांनी पदभार स्वीकारला. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकारांच्या समस्या शासनदरबारी मांडणे आणि पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी संघटनात्मक माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कॅडर कॅम्पमध्ये पत्रकार संघटनेची भूमिका, संघटनात्मक बांधणी, पत्रकारांच्या समस्या, पत्रकारांसाठी उपलब्ध सरकारी योजना आणि बदलत्या पत्रकारितेतील आव्हाने यावर मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे आवाहन पत्रकारांना करण्यात आले.

या कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विशाल पाटील, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. दरेकर आणि घेवारे यांच्या निवडीबद्दल पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande