
बीड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत तिरंगा रॅली आज बीड शहरात मोठ्या उत्साहात पार पडली.तिरंग्याचा मान,सन्मान आणि स्वाभिमान सदैव उंच ठेवण्याचा संकल्प करत तरुणाई यावेळी एकवटली.
यासमयी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखजी,डॉ.योगेश क्षीरसागर नगरसेविका डॉक्टर सारिका क्षीरसागर व अन्य पदाधिकारी यांच्या समवेत रॅली मध्ये सहभागी झाले. भाजपा परिवार,नागरिक यांचा यावेळी उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला.डौलाने फडकणारा तिरंगा, राष्ट्रभक्तीपर गीतांनी भारलेले वातावरण आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने अवघे बीड देशभक्तीच्या रंगात रंगून गेले.
तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही, तर आपली कर्तव्येदेखील लक्षात ठेवावी लागतात. हा तिरंगा हातात घेतल्यानंतर देशसेवेची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीव होते. ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, त्याच संविधानाने आपल्या खांद्यावर जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे डॉक्टर क्षीरसागर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis