सोलापूर जि. परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी विशाल पांडुरंग मुळे यांची नियुक्ती
सोलापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी विशाल पांडुरंग मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या १३ परिव
grdf


सोलापूर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी विशाल पांडुरंग मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-१० अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या १३ परिविक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या सुधारित प्रशिक्षण कार्यक्रमानुसार ही नियुक्ती केली आहे.

विशाल मुळे यांच्याकडे १७ ऑगस्ट २०२६ ते १३ मार्च २०२७ या कालावधीसाठी ३० आठवड्यांकरिता सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विशाल पांडुरंग मुळे हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०२१ मध्ये त्यांची शिक्षणाधिकारी (वर्ग-१) पदावर निवड झाली आहे. या परीक्षेचा निकाल २०२२ मध्ये जाहीर झाला होता.

परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रशिक्षणाच्या कालावधीत मुळे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे प्रशासन, शाळांशी संबंधित कामकाज आणि विभागीय जबाबदाऱ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande