रत्नागिरी : अभाविपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
रत्नागिरी, 12 ऑगस्ट (हिं.स.) । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रा. भा. शिर्के प्रशाला येथील रंजन मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आनंद पं
अभाविपतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान


रत्नागिरी, 12 ऑगस्ट (हिं.स.) । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रा. भा. शिर्के प्रशाला येथील रंजन मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आनंद पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नव्हे तर विद्यार्थ्यांच्या गुणांचा सन्मान असे श्री. पंडित यावेळी म्हणाले.

प्रमुख वक्ते अभाविप जिल्हा प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर न थांबता समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या मंचावर अभाविपचे विभाग संयोजक सुमित पाध्ये उपस्थित होते. शेवटी शहर सहमंत्री यश काळे यांनी आभार मानले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचा समारोप संपूर्ण वंदे मातरम् गीताने करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande