नाशिक - स्वातंत्र्य दिनी महसूल विभागातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
उत्कृष्ट कामगिरीची दखल; नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीकडून निवड नाशिक, 13 ऑगस्ट (हिं.स.)। महसूल विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नाशिक विभागातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात १५ ऑगस्ट रोजी पु
नाशिक - स्वातंत्र्य दिनी महसूल विभागातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव


उत्कृष्ट कामगिरीची दखल; नाशिक विभागीय आयुक्तांच्या समितीकडून निवड

नाशिक, 13 ऑगस्ट (हिं.स.)। महसूल विभागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नाशिक विभागातील १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात १५ ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. महसूल दिनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांसाठी १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल विभागनिहाय गौरविण्यात येते. याच प्रक्रियेंतर्गत नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने यंदाच्या पुरस्कारार्थींची निवड केली आहे.समितीत सदस्य सचिव जितेंद्र वाघ, अपर आयुक्त (महसूल) अरविंद लोखंडे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रशांत काळे, उपायुक्त (पुरवठा) हेमांगी पाटील अपर जिल्हाधिकारी यांचा समावेश होता. समितीने विविध संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन १३ जणांची पुरस्कारासाठी निवड केली.पुरस्कारार्थींमध्ये अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, तहसीलदार विशाल सोनवणे, नायब तहसीलदार पूजा अवघडे, लघुलेखक नितीन पुंडलिक बागुल, सहायक महसूल अधिकारी दत्तात्रय अनिल गंधाडे, मंडळ अधिकारी सोनाली बाबूराव कोल्हे, महसूल सहायक गुणवंत पाटील, ग्राम महसूल अधिकारी महेंद्र प्रकाश शिंदे, वाहनचालक यशवंत वाघ, शिपाई सलीम रज्जाक शेख, महसूल सेवक डोंगर माळीच आणि पोलीस पाटील सुभाष निकुंभे यांचा समावेश आहे.महसूल प्रशासनाच्या विविध स्तरांवर जबाबदारी पार पाडताना कार्यक्षमता, कर्तव्यनिष्ठा आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर या पुरस्कारांचे वितरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात मिळणारा हा सन्मान महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभिमानाचा ठरणार असून, त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande