
सोलापूर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा-सोलापूर यांच्या वतीने बहुआयामी व्यक्तिमत्त्व आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोदी खाना येथील स्व. पद्माकर देव स्मृती सभागृहात उत्साही व मंगलमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराज पूजन आणि आचार्य प्र. के. अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष अशोक किल्लेदार आणि ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी आचार्य अत्रे यांच्या साहित्य, नाट्य, आणि पत्रकारिता क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या अभिवादन सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची, प्रमुख कार्यवाह प्रा. जोतिबा काटे, व्यंकटेश रंगाम, मिलिंद पटवर्धन, सहकार्यवाह सुमित फुलमाबडी, सुहास मार्डीकर, राजा राजेशचंद्र, किरण फडके, रामकृष्ण आघोर, यांच्यासह परिषदेचे सर्व आजीव सदस्य, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व स्थानिक नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि वेळेच्या शिस्तीत कार्यक्रम पार पडल्याने उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड