श्रावण महिन्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे भाविकांसाठी व्यवस्था
त्र्यंबकेश्वर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावण मासासाठी नियोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात भाविकांना पूर्व दरवाजा येथे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वातानुकूलीत दर्शन बारीची व्यव
Arrangements for devotees by


त्र्यंबकेश्वर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे श्रावण मासासाठी नियोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात भाविकांना पूर्व दरवाजा येथे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वातानुकूलीत दर्शन बारीची व्यवस्था असून, यामुळे हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी उभे राहू शकतील. तसेच दर्शन रांगेत ज्येष्ठ मंडळींना बसण्यासाठी व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आला आहे.

श्रावण महिन्याकरीता विश्वस्त

मंडळातर्फे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहील. प्रत्येक श्रावण सोमवारी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत राहील. ग्रामस्थांसाठी मंदिराच्या पश्चिम दरवाजातून दर्शनासाठी जाण्याची वेळ सकाळी ६ ते सकाळी १०.३० व सायंकाळी

६ ते रात्री ८ वाजेपर्यंत राहील. तसेच दर्शनासाठी मंदिरात ग्रामस्थांना मंदिराच्या उत्तर दरवाजा म्हणजेच जाळीगेट ने प्रवेश दिला जाईल. शहरातील ग्रामस्थांनी दर्शनास येताना स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून आपले ओळखपत्र आणणे बंधनकारक राहील. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजाने व देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजातून असेल. गर्भगृह दर्शन सर्व भाविकांकरीता बंद राहिल. या नियोजनामध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने राखून ठेवले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande