डार्विन कसोटी : पहिल्या दिवशी बांग्लादेशचे वर्चस्व, ऑस्ट्रेलियाची फंलदाजी ढेपाळली
डार्विन, 13 ऑगस्ट (हिं.स.)ऑस्ट्रेलियाला स्वस्तात बाद केल्यानंतर बांगलादेशने जोरदार प्रतिहल्ला चढवला. हसन महमूदच्या षटकारांमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्
हसन महमूद


डार्विन, 13 ऑगस्ट (हिं.स.)ऑस्ट्रेलियाला स्वस्तात बाद केल्यानंतर बांगलादेशने जोरदार प्रतिहल्ला चढवला. हसन महमूदच्या षटकारांमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २०० धावांवर (१९८) संपुष्टात आला. डार्विनमधील मारारा क्रिकेट मैदानावर कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या ९६/१ होती.

हसन महमूदच्या गोलंदाजीसमोर कांगारुंचे लोटांगण

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (२२) आणि जेक वेदरॉल्ड (२३) यांनी ४५ धावा जोडून संघाला माफक सुरुवात करून दिली. त्यानंतर हसन महमूदने कहर करण्यास सुरुवात केली आणि सलामीच्या जोडीला बाद केले.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लॅबुशेन केवळ १ धावच करू शकला. मधल्या फळीत, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने डाव सावरला आणि ऑस्ट्रेलियाला २०० धावांच्या जवळ पोहोचवले. त्याने १०९ चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह ७१ धावा केल्या. हसनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्मिथ झेलबाद झाला. स्मिथ बाद झाल्यानंतर, संपूर्ण कांगारू संघ पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळला. कॅमेरॉन ग्रीनने १३, ॲलेक्स कॅरीने १९, बो वेबस्टरने १२, कर्णधार पॅट कमिन्सने ९, मिचेल स्टार्कने १ आणि नॅथन लायनने ७ धावा केल्या. जोश हेझलवूड ४ धावांवर नाबाद राहिला. बांग्लादेशकडून हसनने १७ षटकांत ५५ धावा देऊन ६ बळी घेतले. यासह, हसन ऑस्ट्रेलियामध्ये ५ किंवा अधिक बळी घेणारा पहिला बांगलादेशी गोलंदाज ठरला. तस्किन अहमद आणि इबादत होसेन यांनीही प्रत्येकी २ बळी घेतले.

मिचेल स्टार्कची ऐतिहासिक कामगिरी

पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला मिचेल स्टार्कने पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर शादमन इस्लामला नॅथन लायनकरवी झेलबाद केले. स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये (फिरकी गोलंदाजांसहित) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनून इतिहास रचला.

कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे डावखुरे गोलंदाज

४३४ - मिचेल स्टार्क

४३३ - रंगना हेरथ

४१४ - वसीम अक्रम

३६२ - डॅनियल व्हेटोरी

३५५ - चमिंडा वास

दिवसाचा खेळ संपता संपता, बांगलादेशने एक गडी गमावून ९६ धावा केल्या होत्या. पाहुणा संघ सध्या १०२ धावांनी मागे आहे. तन्झिद हसन तमीम ३२ धावांवर, तर मोमिनुल हक ३५ धावांवर खेळत आहे. त्यांनी ६० धावांची भागीदारी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande