नाशिक - अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। नाशिक-पुणे महामार्गावर शिंदेगाव पुलाजवळ भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार कान्निमुद्दीन बशुरूद्दीन शेख (६०, रा. बागूलनगर, विहितगाव, नाशिकरोड) यांचा ट्रकच्या माग
नाशिक - अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू


नाशिक, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। नाशिक-पुणे महामार्गावर शिंदेगाव पुलाजवळ भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार कान्निमुद्दीन बशुरूद्दीन शेख (६०, रा. बागूलनगर, विहितगाव, नाशिकरोड) यांचा ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला दुचाकी चालकही या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्निमुद्दीन शेख हे सकाळी आठ वाजता मित्रासोबत दुचाकीने कामानिमित्त जात होते.

शिंदेगाव पुलापासून काही अंतरावर असताना मागून आलेल्या भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे शेख रस्त्यावर फेकले गेले आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा गंभीर अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच मयताचा मुलगा रिजवान शेख याने नागरिकांच्या मदतीने वडिलांना तातडीने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande