
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। चंदनझिरा येथून उज्जैनच्या श्री महाकालेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्याचा अत्यंत भक्तिमय आणि भावनिक वातावरणात शुभारंभ झाला. तुळजाभवानी माता मंदिरात विधिवत आरती झाल्यानंतर आमदार श्री. अर्जुनराव खोतकर यांच्या शुभहस्ते पायी दिंडी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिंडीतील सर्व वारकरी व भाविकांना मनापासून शुभेच्छा देत महादेवाच्या चरणी प्रार्थना केली. “महादेवाच्या कृपेने सर्वांचा प्रवास सुखरूप होऊ दे, माझा बळीराजा सुखी राहू दे, शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ मिळू दे आणि प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी, धन-धान्य नांदू दे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते झालेला हा शुभारंभ दिंडीतील वारकरी व भाविकांसाठी विशेष आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भाविकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या या धार्मिक व भक्तिमय प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
चंदनझिरा येथील तब्बल ८० वारकरी व भाविक महाकालेश्वराच्या दर्शनासाठी पायी उज्जैनच्या दिशेने मार्गस्थ झाले. पायात लांबचा प्रवास असला तरी मनात महादेवाच्या दर्शनाची ओढ आणि ओठांवर ‘हर हर महादेव’चा जयघोष होता. नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तीच्या वातावरणात दिंडीने प्रस्थान केले.
दिंडीचे मुख्य आयोजक श्री. प्रताप पवार, अर्जुन म्हात्रे, विनोद किंगरे व किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र सोहळा पार पडत आहे.
यावेळी माळी महासंघ जालना जिल्हाध्यक्ष संतोष रासवे, सीताराम कटारे, सचिन दैने, रितेश पंचारिया, दिनेश आवटे, प्रदीप रासवे, कृष्णा गवारे, अनिल पारे सुनिल आदमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच भाऊसाहेब गारखेडे, बाबासाहेब गारखेडे, प्रल्हाद मते, डॉ. गोसावी, बाळू मावसकर, दगडू बर्डे, कृष्णा घोरपडे, भरत मोरे, प्रेम परदेशी, केशव ढवळे, श्रीहरी जगताप, सुनील वाकुंडे, बबन केणेकर, कार्तिक काकडे, पिंकोडे जाधव, वेंकटेश जाधव, विश्वंबर औटुळे, अमोल वैद्य यांच्यासह वारकरी व भाविक सहभागी झाले.
“माझा बळीराजा सुखी राहू दे... सर्वांच्या घरात सुख-समृद्धी, धन-धान्य नांदू दे...” या प्रार्थनेसह महादेवाचे नामस्मरण करत दिंडी उज्जैनच्या दिशेने मार्गस्थ झाली.
आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या शुभेच्छा आणि महादेवाचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या या भक्तिमय दिंडीचा प्रवास सुखरूप होवो, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis