गोंडवाना विद्यापीठाच्या स्वा. सावरकर साहित्य अध्यासन केंद्रातर्फे १४ ऑगस्ट रोजी विशेष व्याख्यान
चंद्रपूर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राच्या वतीने विभाजन विभीषिका स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६
गोंडवाना विद्यापीठाच्या स्वा. सावरकर साहित्य अध्यासन केंद्रातर्फे १४ ऑगस्ट रोजी विशेष व्याख्यान


चंद्रपूर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राच्या वतीने विभाजन विभीषिका स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी (भा.पो.से.) यांच्या हस्ते होणार आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते, लेखक व व्याख्याते श्री. शरद पोंक्षे यांचे ‘सावरकरांचे साहित्य’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनीष देशपांडे, अध्यासन केंद्राचे प्रास्तावक यश बांगडे गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande