
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।दौलताबाद टी पॉईंट ते वेरुळ व फुलंब्री ते खुलताबाद मार्गावरील जड वाहतूक मार्गात १८ सप्टेंबर दरम्यान बदल दौलताबाद टी पॉईंट ते वेरुळ आणि फुलंब्री ते खुलताबाद या मार्गावरील सर्व जड वाहतूक १८ सप्टेंबर याकालावधीत बंद ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव यांनी निर्गमित केले आहेत.
या कालावधीत जड वाहतुकीचे पर्यायी मार्ग याप्रमाणे-
कन्नडहून वेरुळ–खुलताबाद–दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने छत्रपती संभाजीनगर–शरणापूर फाटा–माळीवाडा–कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडकडे जातील. फुलंब्री–खुलताबाद–वेरुळमार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री–छत्रपती संभाजीनगर–शरणापूर फाटा–माळीवाडा–कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडकडे जातील. तसेच वैजापूर–शिवूर–पाचपीरवाडी–वेरुळ–खुलताबादमार्गे फुलंब्रीकडे जाणारी वाहने वैजापूर–शिवूर–पाचपीरवाडी–शरणापूर–छत्रपती संभाजीनगरमार्गे फुलंब्रीकडे जातील.
श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती देवस्थानात आणि सोमवारी वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पायी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांनी येतात. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता हा बदल करण्यात आला असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis