
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.) अंबड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जालना येथून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.या पार्श्वभूमीवर आमदार नारायण कुचे यांनी वीन पोलीस स्टेशनच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा व आवश्यक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आलेली ही नवीन इमारत अंबड शहराच्या कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होऊन नागरिकांना तत्पर व प्रभावी पोलीस सेवा मिळण्यास यामुळे मदत होईल.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरसेवक, संबंधित अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोकार्पण सोहळा यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी आवश्यक नियोजन, बैठक व्यवस्था, ऑनलाइन उद्घाटनाची तांत्रिक व्यवस्था तसेच इतर तयारीची पाहणी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis