चिखलदरातील आश्रमशाळेत निकृष्ट आहाराच्या तक्रारी
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)। तालुक्यातील टेम्ब्रूसोंडा येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्याचा आरोप असून निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्य
आश्रमशाळेत निकृष्ट आहाराच्या तक्रारी


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

तालुक्यातील टेम्ब्रूसोंडा येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्याचा आरोप असून निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. टेम्ब्रूसोंडा आश्रमशाळेत सुमारे ६५० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी बहुतेक विद्यार्थी वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या आढळल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नियमानुसार पुरेसा व पौष्टिक आहार मिळणे अपेक्षित आहे. मात्र नियमितपणे अंडी, केळी व दूध दिले जात नसल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. अनेकदा अपुरा आहार मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहावे लागत असल्याचा आरोप आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कोणत्या दर्जाचे अन्न मिळते, याची तपासणी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

तांदूळ खराब असल्यामुळे तो परत केला. आश्रमशाळांना अन्न महामंडळाकडून तांदळाचा पुरवठा करण्यात येतो. खराब तांदूळ वापस करून चांगला घेतला आहे. आश्रमशाळेत एक ते १२ पर्यंतचे वर्ग आहेत व सध्या ६३० विद्यार्थी आहेत.

गजानन पुनकर, मुख्याध्यापक, टेम्ब्रूसोंडा.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande