राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' द्या आ. राजेश वानखडे यांचे मागणी
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.) विकासाची संकल्पना आपल्या ग्रामगीतेतून मांडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून राष्ट्रनिर्माण, ग्रामविकास, सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनस
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' द्या आ. राजेश वानखडे यांचे मागणी


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.) विकासाची संकल्पना आपल्या ग्रामगीतेतून मांडणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून राष्ट्रनिर्माण, ग्रामविकास, सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या अतुलनीय कार्याचा आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचा गौरव म्हणून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात यावा, अशी मागणी तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी केली आहे.

आमदार राजेश वानखडे यांनी महसूल ग्राम मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे केलेल्यामागणीची दखल घेत महाराष्ट्राचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' प्रदान करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्याच्या मागणीला अधिक बळमिळाले आहे. अशीच मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा करण्यात येणार असून राज्याच्या वतीने प्रभावी शिफारस केंद्र शासनाकडे करण्याबाबत सुद्धा विनंती केलेली आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande