‘नशामुक्त धाराशिव–विकसित धाराशिव’चा संदेश देत नशामुक्ती सायकल रॅली
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.) : ‘नशामुक्त भारत–विकसित भारत, नशामुक्त भारत–सशक्त भारत’चा संदेश देत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव येथे नशामुक्ती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. युवका
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.) : ‘नशामुक्त भारत–विकसित भारत, नशामुक्त भारत–सशक्त भारत’चा संदेश देत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत धाराशिव येथे नशामुक्ती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून नशामुक्त, सशक्त व विकसित समाजनिर्मितीचा संकल्प करावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. भंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सचिन कवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थी, अधिकारी आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फलक व पोस्टर्स हातात घेऊन जनजागृती केली.

‘नशामुक्त भारत–विकसित भारत’, ‘नशामुक्त भारत–सशक्त भारत’ आणि ‘नशामुक्त धाराशिव–विकसित धाराशिव’ अशा घोषणांनी रॅलीचा परिसर दुमदुमून गेला.

व्यसनमुक्त समाजाची निर्मिती ही केवळ शासनाची जबाबदारी नसून त्यासाठी युवक, पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. व्यसनांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर, कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवर तसेच समाजाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच मित्र-परिवारालाही व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश द्यावा, हा या जनजागृती उपक्रमाचा व्यापक उद्देश होता.

विविध विभागांचे सहकार्य

या उपक्रमाचे आयोजन

जिल्हा परिषद धाराशिवच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले. रॅलीच्या यशस्वितेसाठी क्रीडा कार्यालय, समाजकल्याण विभाग, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग तसेच विविध प्रशासकीय विभागांनी सहकार्य केले. यश मेडिकल फाउंडेशन संचलित येळाई व्यसनमुक्ती केंद्र, येरमाळा यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

‘नशामुक्त धाराशिव–विकसित धाराशिव’चा संकल्प

व्यसनमुक्त युवक हीच सशक्त राष्ट्राची ताकद असून, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि विधायक उपक्रमांकडे वळावे, असा संदेश रॅलीतून देण्यात आला. यावेळी ‘नशामुक्त धाराशिव–विकसित धाराशिव’चा संकल्प करण्यात आला.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande