धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांसाठी नवीन २०० के वी / ४०० के वी EHV उपकेंद्रांना मंजुरीची मागणी
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांसाठी नवीन २०० के वी / ४०० के वी EHV उपकेंद्रांना मंजुरीची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कडे केली आहे धाराशिव, लातूर व सोलापूर जिल
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांसाठी नवीन २०० के वी / ४०० के वी EHV उपकेंद्रांना मंजुरीची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कडे केली आहे

धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यांतील वाढती कृषी, औद्योगिक, शहरी व ग्रामीण विजेची मागणी लक्षात घेता विद्युत पारेषण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी श्री. मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री, विद्युत मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये कासार शिरशी - ता.निलंगा

शिराढोण - ता.कळंब, जि. धाराशिव

येरमाळा/येडशी- जि. धाराशिव

लोहारा - जि. धाराशिव

वडगाव सिद्धेश्वर - ता.धाराशिव / कौडगाव - (बार्शी) ता.धाराशिव

मुरूम - ता.उमरगा

बार्शी -जि. सोलापूर येथे २०० के.व्ही. EHV उपकेंद्रे मंजूर करन्याची मागणी केली

तुळजापूर - जि. धाराशिव

परंडा - जि.धाराशिव येथे ४०० के.व्ही. EHV उपकेंद्रे मंजूर करन्याची मागणी केली

या उपकेंद्रांमुळे विद्युत पारेषण क्षमता वाढण्यासोबतच ग्रामीण व शहरी भागातील वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता सुधारण्यास मदत होईल. तसेच शेतकरी, घरगुती ग्राहक, उद्योग, लघु व मध्यम उद्योग आणि आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार आहे.

उपरोक्त सर्व प्रस्तावांची तातडीने तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून देत संबंधित EHV उपकेंद्रांना लवकरात लवकर मंजुरी देण्याची विनंती केली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande