नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 5 अटकेत
आंतरराज्यीय रॅकेटचा भांडाफोड, शहर - ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई नाशिक, 13 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरात छुप्या रीतीने सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्याचा नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने संयुक्त का
Fake currency factory busted


Fake currency factory busted


आंतरराज्यीय रॅकेटचा भांडाफोड, शहर - ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई

नाशिक, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरात छुप्या रीतीने सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्याचा नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका खासगी बंगल्यात चालणाऱ्या रॅकेटचा व्यवसाय मोडून काढत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, घटनास्थळावरून लाखो रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी बनावट नोटा तयार करण्यासाठी एका अनोख्या पद्धतीचा वापर करत होते. खऱ्या चलनी नोटा विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्यांची शाई दुसऱ्या कागदावर उठवली जायची आणि हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा तयार केल्या जायच्या. बाजारात १० लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या मोबदल्यात ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून हे रॅकेट चालवले जात होते. असाच एक व्यवहार सुरू असताना पोलिसांनी जाळे रचून छापा टाकला.

तळेगाव शिवारातील बंगल्यातून नोटा छापण्याचे रसायने, प्रिंटिंग साहित्य आणि मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकसह तेलंगणा राज्याशी जोडलेल्या आंतरराज्यीय रॅकेटचा भांडाफोड झाला असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अटक करण्यात आलेले संशयित आरोपीन मध्ये. अमरेश्वर आईथा (रा. तेलंगणा), दासरी सत्यइ (रा. तेलंगणा), गोकुळ दाते (रा. तळेगाव, नाशिक), हिरामण दाते (रा. तळेगाव, नाशिक), मच्छिंद्र घनदाट (रा. सातपूर, नाशिक) केले असून त्यांच्याकडून 12 लाख 19 हजार 580 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये चार चाकी गाड्या तसेच 9756 रुपये बनावट आणि 1950 रुपये रोख स्वरूपात असल्याचे पोलिसांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande