अदानींच्या सिमेंट प्रकल्पासाठी वनजमीन; रायगडमध्ये विरोधाचे सूर
रायगड, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। अदानी समूहाशी संबंधित अदानी सिमेंटेशन लिमिटेडच्या रायगड सिमेंट बल्क टर्मिनल प्रकल्पासाठी अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि शहाबाज परिसरातील ०.६४९७ हेक्टर वनजमीन वळविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने स्थानिक पातळीवर विरोधाचे
स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षी गावाचा बोर्डच झाडाझुडपांत; मिळकतखार मळ्याच्या विकासावर प्रश्नचिन्ह!  अँड.रत्नाकर पाटील अलिबाग देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा होत असताना, अलिबाग तालुक्यातील मिळकतखार मळा येथे मात्र गावाची ओळख सांगणारा ग्रामपंचायतीचा बोर्ड झाडाझुडपांत हरवलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षातही गावाच्या प्रवेशद्वारावरील फलकाची अशी दुरवस्था पाहायला मिळत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. “स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली; मात्र गावाचा बोर्डच झाडाझुडपांत हरवला आहे, मग गावाच्या विकासाचे काय?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. गावाची ओळख दर्शविणारा ग्रामपंचायतीचा फलक हा केवळ माहिती देणारा बोर्ड नसून गावाचे अस्तित्व आणि प्रशासनाची उपस्थिती दर्शविणारे महत्त्वाचे चिन्ह आहे. मात्र मिळकतखार मळा येथील हा फलक झाडाझुडपांनी पूर्णपणे वेढलेला असून परिसराची स्वच्छता व फलकाच्या देखभालीकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. १५ ऑगस्ट हा केवळ ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि भाषणांपुरता मर्यादित न राहता गावातील मूलभूत समस्या सोडविण्याचा आणि सर्वांगीण विकासाचा संकल्प करण्याचा दिवस ठरावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मिळकतखार मळा परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा तसेच गावाच्या ओळखीच्या फलकाची नियमित देखभाल याकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनी गावाचा ओळखफलकच झाडाझुडपांत लपलेला दिसणे ही केवळ एका फलकाची दुरवस्था नसून गावाच्या विकासाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याचा विचार करण्यास भाग पाडणारे चित्र असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. “स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा आहे. मिळकतखार मळ्यालाही विकासाचे खरे स्वातंत्र्य मिळावे,” अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


रायगड, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। अदानी समूहाशी संबंधित अदानी सिमेंटेशन लिमिटेडच्या रायगड सिमेंट बल्क टर्मिनल प्रकल्पासाठी अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि शहाबाज परिसरातील ०.६४९७ हेक्टर वनजमीन वळविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने स्थानिक पातळीवर विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

शहापूर-शहाबाज परिसरात सिमेंट बल्क टर्मिनल उभारण्याचा प्रस्ताव असून, या प्रकल्पात बर्थिंग जेट्टी, कन्व्हेयर कॉरिडॉर, बॅकअप सुविधा आणि जोडरस्ता आदी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. समुद्रमार्गे सिमेंटची वाहतूक व साठवणूक करण्यासाठी या सुविधांचा वापर होणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक वनजमीन वळविण्याच्या प्रस्तावाला यापूर्वी केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या संबंधित यंत्रणेकडे मंजुरी प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले होते.

दरम्यान, वनजमीन उद्योग प्रकल्पासाठी वळविण्याचा निर्णय झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. खाडी परिसरातील पर्यावरणीय समतोल, जैवविविधता, स्थानिकांचे पारंपरिक व्यवसाय तसेच प्रकल्पामुळे वाढणारी वाहतूक यांचा परिसरावर काय परिणाम होणार, याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

विशेषतः आदिवासी आणि वनवासी नागरिकांच्या प्रलंबित वनहक्क दाव्यांचा मुद्दाही यानिमित्ताने चर्चेत आला आहे. मोठ्या औद्योगिक प्रकल्पांसाठी प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाते, मात्र वनहक्कासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांच्या दाव्यांवर निर्णय घेण्यास विलंब का होतो, असा सवाल उपस्थित होत आहे.

विकासाला विरोध नसला तरी पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका नागरिकांकडून मांडली जात आहे. शासनाने प्रकल्पासंदर्भातील पर्यावरणीय अहवाल, वनजमीन वळविण्याची कारणे आणि स्थानिकांच्या हरकतींबाबत पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे. वनजमीन वळविण्याच्या निर्णयामुळे रायगडमधील पर्यावरण आणि विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande