डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगावात भाजपाची भव्य तिरंगा रॅली
बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य-दिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात डौलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा आणि उत्स्फूर्त नागरिकांचा सहभा
प्रितम मुंडे


बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य-दिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात डौलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा आणि उत्स्फूर्त नागरिकांचा सहभाग यामुळे संपूर्ण शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक सहभागी झाले होते. रॅलीतील तिरंग्यांची आकर्षक सजावट आणि देशभक्तीचा उत्साह लक्षवेधी ठरला.

डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली माजलगावकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भव्य स्वरूपात पार पडली.

रॅलीच्या माध्यमातून ‘तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक आहे’, हा संदेश देण्यात आला. संपूर्ण रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande