अमरावतीत 'हर घर तिरंगा' अंतर्गत भव्य तिरंगा रॅली उत्साहात
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)। देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान आणि आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ''हर घर तिरंगा'' उपक्रमांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल
अमरावतीत 'हर घर तिरंगा' अंतर्गत भव्य तिरंगा रॅली


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)। देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान आणि आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.नेहरू मैदान येथून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभचौक, मालवीय चौक आणि इर्विन चौक मार्गे शहरातून मार्गक्रमण करत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप केला. रॅलीदरम्यान जयस्तंभचौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच इर्विन चौक येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीमध्ये हजारो अमरावतीकरांसह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.तिरंगा हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणांनी भारावलेल्या वातावरणात निघालेल्या या रॅलीने शहरात राष्ट्रप्रेमाचा उत्साह निर्माण केला. यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा तसेच अवयवदानाची शपथ घेतली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद दाद मिळवली. रॅलीच्या समारोपावेळी रंगीबेरंगी तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले. 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत १२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, तिरंगा रॅली हा त्यातील महत्त्वाचा उपक्रम ठरला.

रॅलीला महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते नाना आमले, गटनेते डॉ.राजेंद्र तायडे, गटनेते शेख हमीद शेख वाहेद, झोन सभापती माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, इस्माइल कासम लालुवाले, किशोर जाधव, खॉ आसिया अंजुम वहिद, विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ.मधुरा कहाळे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील व उपसभापती सुमती ढोके, माध्यमिक पुर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापती अॅड.प्रिती हर्षल रेवणे व उपसभापती वंदना मडघे, महिला व बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे व उपसभापती लता देशमुख, नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, महापालिका व पोलिस विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande