
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम तसेच नागरिकांमध्ये आरोग्य व योगाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम्’ समूह गायन व ‘योगा फॉर हेल्थ’ योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8 ते 9 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन तसेच ‘योगा फॉर हेल्थ’ अंतर्गत विविध योगासने व योग प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis