
कोल्हापूर, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत भाजपच्यावतीने कोल्हापूर शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर तर्फे काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा पदयात्रेत भाजपचे करवीर दक्षिणचे आ. अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या या पदयात्रेत प्रत्येक जण तिरंगा ध्वज हाती घेऊन देशभक्तीपर गीत म्हणत सहभागी झाले होते. या पदयात्रेची सांगता छ. शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. यावेळी महापौर रुपाराणी निकम, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारीणी सदस्य महेश जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, नगरसेविका दिपा ठाणेकर आदी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar