छ. संभाजीनगर : स्वातंत्र्यदिनाला पालकमंत्री शिरसाटांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्य दिनःजिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शनिवार, दि. १५ रोजी सकाळी ९.०५ वाजता व
छ. संभाजीनगर : स्वातंत्र्यदिनाला पालकमंत्री शिरसाटांच्या हस्ते होणार ध्वजारोहण


छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्य दिनःजिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शनिवार, दि. १५ रोजी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या या मुख्य शासकीय समारंभास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande