सिंधुदुर्ग : कलमठ ग्रामपंचायतीचा सातारा जिल्ह्यात अभ्यास दौरा यशस्वी
सिंधुदुर्ग, 13 ऑगस्ट (हिं.स.) । कलमठ (ता. कणकवली) ग्रामपंचायतीचा सातारा जिल्ह्यात अभ्यास दौरा यशस्वी झाला. माण्याचीवाडी व बनवडी ग्रामपंचायतींच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती कलमडच्या ग्रामस्थांनी घेतली. कलमठ ग्रामपंचायत आणि कोकण कला व शिक्षण वि
सातै दौऱ्यात सहभागी झालेले कलमठ ग्रामपंचायतीचे सदस्य


सिंधुदुर्ग, 13 ऑगस्ट (हिं.स.) । कलमठ (ता. कणकवली) ग्रामपंचायतीचा सातारा जिल्ह्यात अभ्यास दौरा यशस्वी झाला. माण्याचीवाडी व बनवडी ग्रामपंचायतींच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती कलमडच्या ग्रामस्थांनी घेतली.

कलमठ ग्रामपंचायत आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेरील ग्रामपंचायत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कलमठ ग्रामपंचायतीला आदर्श ग्राम बनविण्याच्या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यात सरपंच संदीप मेस्त्री, जि. प. सदस्या श्रीमती सुप्रिया मेस्त्री, पं. स. सदस्य गुरुनाथ वर्देकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील चिंदरकर, दिनेश गोठणकर, नितीन पवार, रवींद्र यादव, श्रेयस चिंदरकर, सचिन खोचरे यांच्यासह एकूण १८ जण सहभागी झाले.

अभ्यास दौऱ्यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याचीवाडी ग्रामपंचायतीस भेट देण्यात आली. सरपंच माणे यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रत्यक्ष गावफेरी करून पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, सांडपाणी व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन तसेच जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या स्नानगृहाची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीस भेट देऊन जलशुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व गांडूळखत निर्मिती प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. कलमठ ग्रामपंचायतीच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी हा अभ्यास दौरा अत्यंत उपयुक्त ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande