
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।जालना शहरात काळुंका माता मंदिर येथे शिव महापुराण कथा व अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. यावेळी त्यांनी शिव महापुराण कथेतील अमृतवचनांचे श्रवण करून भगवान महादेवाचे दर्शन घेतले.
शिव महापुराण कथा आणि अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने समाजबांधव व भाविकांनी उपस्थित राहून कथाश्रवणाचा आणि शिवनामाचा लाभ घेतला.यावेळी ब्रह्मा परळकर, संतोष परळकर, चंदर अप्पा खताडे, राम आप्पा काटकर, छगन अप्पा धोकडे, प्रकाश आप्पा काटकर, रखमन आप्पा परळकर, गणू आप्पा काटकर, अमरदीप शिंदे, गोविंदजी सोनवणे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांनी भगवान शिवाच्या नामस्मरणात सहभागी होत आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. शिव महापुराणाच्या माध्यमातून भगवान शिवाच्या महतीचे, भक्तीचे आणि आध्यात्मिक विचारांचे चिंतन करण्यात आले.काळुंका माता मंदिर येथे आयोजित या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अखंड शिवनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis