महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांची हव्याप्र मंडळाला भेट
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड येथे १९८५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकाविणारे कोल्हापूरचे सुप्रसिद्ध पैलवान विष्णू जोशीलकर यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या लालमातीच्या आखाड्याला भेट दिली. यावेळी त
महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांची हव्याप्र मंडळाला भेट


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवड येथे १९८५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकाविणारे कोल्हापूरचे सुप्रसिद्ध पैलवान विष्णू जोशीलकर यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या लालमातीच्या आखाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी मंडळाच्या कार्याचे आणि आखाडा संस्कृतीच्या जतनाचे कौतुक केले.

विष्णू जोशीलकर हे कुस्तीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरचे रहिवासी असून त्यांनी भारतीय प्राचीन खेळ असलेल्या कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी योगदान दिले आहे. तसेच ‘मराठी तालीम’ या चित्रपटात त्यांनी वस्तादाची भूमिका साकारली आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या लालमातीच्या आखाड्याला भेट दिल्यानंतर जोशीलकर यांनी आखाड्याची पाहणी केली. यानंतर त्यांनी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी विदर्भ केसरी प्रा. डॉ. संजय तीरथकर यांच्या हस्ते पैलवान विष्णू जोशीलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दिलीप इटनकर, दिलीप पैठणकर, आकाश केसरवानी, जितेंद्र भुयार, वेदांत तीरथकर, प्रशांत अडसड, सनी इंगोले यांच्यासह अनेक पैलवान उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande