एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई; तिघांची हर्सूल कारागृहात रवानगी
बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीन सराईत वा
एमपीडीए अंतर्गत कारवाई


बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीन सराईत वाळूमाफियांवर 'एमपीडीए' कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करत त्यांची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

या कारवाईत चकलंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्षय महादेव इंगळे (वय २८, रा. बागेपिंपळगाव, ता. गेवराई), तलवडा येथील गोविंद चंद्रहास गोबरे (वय ३०, रा. टाकरवण, ता. माजलगाव) आणि माजलगाव ग्रामीण हद्दीतील तुकाराम कचरुबा आव्हाड (वय ३९, रा. नित्रुड, ता. माजलगाव) या तिघांचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आली. वाळूची चोरटी वाहतूक, गुटखा विक्री आणि गुंडगिरी करणाऱ्यांवर यापुढेही एमपीडीए आणि मोक्कांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande