नांदेड जिप माजी अध्यक्ष माणिकराव इंगोले यांचे निधन
नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव इंगोले यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने राजकारण व समाजकारणातील एक वरिष्ठ सहकारी गमावल्याची भावना मनात आहे.अशी प्रतिक्रिया भाजपचे खासद
अ


नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव इंगोले यांचे आज निधन झाले.

त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने राजकारण व समाजकारणातील एक वरिष्ठ सहकारी गमावल्याची भावना मनात आहे.अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

खासदार अशोक चव्हाण आपल्या शोकसंदेशात म्हणतात,

माणिकराव इंगोले हे मातीशी नाळ जुळलेले आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव आग्रही असलेले लोकनेते होते. पंचायत समिती सदस्य व सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले. त्यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह होता. अलिकडेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

त्यांच्या निधनाने झालेली वैयक्तिक आणि सामाजिक हानी कधीही भरून निघणारी नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि इंगोले कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande