
हिंगोली, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व CEO श्री. सतीश कुमार यांच्याकडे नांदेड–हिंगोली–अकोला रेल्वे मार्गासह मराठवाड्यातील महत्त्वाच्या रेल्वे सेवांबाबतचे हे निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये नांदेड–श्री गंगानगर रेल्वे दररोज सुरू करणे, नांदेड–जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेसचा विस्तार, हिंगोली मार्गे चार नवीन सुपरफास्ट रेल्वे, अमरावती–तिरुपती रेल्वे दररोज करणे, अकोला–ढोणे दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू करणे तसेच इतर महत्त्वाच्या रेल्वे सुविधांबाबत ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्लीपासून गावापर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व! आहे
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis