
नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा, १९९९ च्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे लोक अभिरक्षक श्री. शकील, श्री. मुधोळकर आणि दादासाहेब वैद्य यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा, त्यातील तरतुदी तसेच रॅगिंगविरोधी उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
प्रमुख व्याख्याते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगचे दुष्परिणाम, कायदेशीर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis