अमरावती जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)एचआयव्ही,एड्स प्रतिबंधाबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाड्यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्
जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)एचआयव्ही,एड्स प्रतिबंधाबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाड्यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय रेड रन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, आरडीआयके महाविद्यालय बडनेरा, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या स्पर्धेत युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, विजेतांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, आरडीआयके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख, प्रा. अतुल पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, प्रा. नकुल देशमुख, प्रा. प्रिती देशमुख आणि जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकार यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार यांनी एचआयव्ही संक्रमणाची तीव्रता कमी करण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

जनजागृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील रेड रिबन क्लब सदस्यांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे नियम, मार्ग आणि आयोजनाबाबत प्रा.अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.पुरुष गटात श्यामा प्रसाद मुखर्जी महाविद्यालय, शेंदुरजना घाटचा पीयुष मसाने प्रथम, प्रज्वल हटले द्वितीय, तक्षशिला महाविद्यालयाचा शंकर नांदे तृतीय आला. महिला गटात आरडीआयके महाविद्यालयाची वैष्णवी वानखडे प्रथम, नाथे विद्यालयाची मीनाक्षी खारपाटे द्वितीय आणि महिला महाविद्यालयाची निशा जगताप तृतीय ठरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande