संसदीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच, विरोधी पक्ष चर्चेपासून दूर राहिले : किरेन रिजिजू
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट (हिं.स.)संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी तहकूब करून समाप्त झाले. अधिवेशनाच्या समारोपानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. रिजि
किरेन रिजीजू


नवी दिल्ली, १३ ऑगस्ट (हिं.स.)संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी तहकूब करून समाप्त झाले. अधिवेशनाच्या समारोपानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला.

रिजिजू यांनी असा आरोप केला की, विरोधी पक्ष सभागृहातील अर्थपूर्ण चर्चा आणि वादविवादांपासून पळ काढत आहेत. ते म्हणाले की, कायदेविषयक कामाच्या दृष्टीने हे अधिवेशन यशस्वी ठरले, परंतु गोंधळ आणि व्यत्ययांमुळे चर्चेच्या दृष्टिकोनातून ते निराशाजनक ठरले.संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनादरम्यान एकूण १२ महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. मात्र, गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर लक्षणीय परिणाम झाला. एकूण निर्धारित वेळेपैकी लोकसभेत केवळ १९ टक्के आणि राज्यसभेत ३९ टक्केच कामकाज झाले.रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार, एनडीए सदस्य आणि काही विरोधी खासदार चर्चेत सहभागी झाले असताना, प्रमुख विरोधी पक्षांनी वारंवार व्यत्यय आणला आणि सभात्याग केला.

किरेन रिजिजू यांनी माहिती दिली की, लोकसभेत मंजूर झालेल्या १२ विधेयकांपैकी ११ विधेयके चर्चेविनाच मंजूर करावी लागली, कारण विरोधी पक्षांनी चर्चेत भाग घेतला नाही. अधिवेशनादरम्यान, केवळ एकाच विधेयकावर, म्हणजेच सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायद्यावर, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये पूर्ण आणि सविस्तर चर्चा झाली.परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हा कायदा आणण्यात आला होता. राज्यसभेत, मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सभात्याग करूनही, इतर विरोधी पक्षांनी चर्चेत भाग घेतला.

आपल्या प्रदीर्घ संसदीय अनुभवाचा हवाला देत रिजिजू म्हणाले की, आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी विरोधी पक्षाला चर्चेतून माघार घेताना पाहिले. ते म्हणाले की, सामान्यतः विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतो आणि सरकारला उत्तर देणे बंधनकारक असते, परंतु येथे सरकार स्वतःच चर्चेची मागणी करत होते आणि विरोधी पक्ष सबबी सांगून पळ काढत होता. त्यांनी याला संसदीय लोकशाहीसाठी एक अस्वास्थ्यकर लक्षण म्हटले.काँग्रेस हल्लाबोल करताना रिजिजू म्हणाले की, असे दिसते की संसद परिसरात फलक घेऊन फिरणे आणि घोषणाबाजी करणे हेच काँग्रेस खासदारांनी आपले मुख्य काम बनवले आहे.

नवीन काँग्रेस खासदारांबद्दल विशेष सहानुभूती व्यक्त करत ते म्हणाले की, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या या वृत्तीमुळे नवीन सदस्यांना शिकण्याची आणि अर्थपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली नाही. आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या वृत्तीत सकारात्मक बदल दिसून येईल, अशी आशा रिजिजू यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande