पॅरिस सेंट-जर्मेन सलग दुसऱ्यांदा युएफा सुपर कप चॅम्पियन
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट (हिं.स.) - ख्विचा क्वारात्शेलिया आणि डेझायर डोए यांच्या गोलच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) ने युरोपा लीग चॅम्पियन ॲस्टन व्हिलाला २-१ ने पराभूत करत आपला सलग दुसरा युएफा सुपर कप जिंकला. सामन्यादरम्यान काही वेळा ॲस्टन व्हिल
पॅरिस सेंट-जर्मेनचा संघ


नवी दिल्ली, 13 ऑगस्ट (हिं.स.) - ख्विचा क्वारात्शेलिया आणि डेझायर डोए यांच्या गोलच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) ने युरोपा लीग चॅम्पियन ॲस्टन व्हिलाला २-१ ने पराभूत करत आपला सलग दुसरा युएफा सुपर कप जिंकला. सामन्यादरम्यान काही वेळा ॲस्टन व्हिलाकडून दबावाखाली असल्याचे दिसत असलेल्या पीएसजीने, आपला अनुभव, रणनीतिक ताळमेळ आणि वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला. गेल्या मोसमातील पीएसजीचा हिरो असलेल्या क्वारात्शेलियाने साल्झबर्ग स्टेडियमवर आपल्या खेळाने वातावरण पेटवून दिले. या जॉर्जियन स्टारने डोएकडून मिळालेला पास घेतला, आतल्या बाजूने कट मारला आणि मार्को बिझोटला चकवून एक जोरदार शॉट मारून गोल नोंदवला.

व्हिलानेही दमदार खेळ करत पीएसजीच्या बचावाला अनेक वेळा भेदले. व्हिलाचा ब्रायन माडजो हा पीएसजीच्या बचावासाठी सर्वात कठीण फुटबॉलपटू ठरला. ब्रायन माडजोने व्हिलाचा एकमेव गोल केला आणि तो सुपर कपमध्ये गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. ६१ व्या मिनिटाला पीएसजीने आघाडी घेतली. बदली खेळाडू उस्मान डेम्बेलेच्या अचूक पासवर डोने बिजोतला चकवून एक शानदार गोल केला.

उनाई एमरीने बरोबरी साधण्यासाठी टॅमी अब्राहम आणि रॉस बार्कलेसारख्या व्हिलाच्या आक्रमक खेळाडूंना मैदानात उतरवले, पण ते पीएसजीचा बचाव भेदू शकले नाहीत. पीएसजीने २-१ ने विजय मिळवला. विजेतेपद जिंकल्यानंतर, पीएसजीचे प्रशिक्षक लुईस एनरिके म्हणाले, आम्हाला आधीच माहित होते की हा सामना कठीण असणार आहे. माझ्या खेळाडूंनी दाखवून दिले की ते कशाचे बनलेले आहेत. आम्ही कदाचित सर्वोत्तम शारीरिक स्थितीत नसू, पण पुन्हा एकदा, हे आमच्या डीएनएचे आणि आमच्या चाहत्यांचे खरे प्रदर्शन आहे, ज्यांनी आम्हाला ट्रॉफी जिंकण्यास आणि एक उच्च दर्जा स्थापित करण्यास मदत केली.

पीएसजीने २०२४-२५ आणि २०२५-२६ हंगामांची लय कायम ठेवत, आणखी एक ट्रॉफी जिंकली आणि आपल्या इतिहासातील दुसऱ्या सुपर कपसह आपले विजेतेपद कायम राखले. सलग दोन युएफा विजेतेपद जिंकणारा पीएसजी हा तिसरा क्लब आहे. यापूर्वी हा पराक्रम एसी मिलान (१९८९, १९९०) आणि रियल माद्रिद सीएफ (२०१६, २०१७) यांनी केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande