महाराष्ट्रातील जल जीवन मिशन २.०च्या प्रगतीचा आढावा
नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील जल जीवन मिशन २.०च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली खासदार चव्हाण यांनी सांगितले, महाराष
अ


नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील जल जीवन मिशन २.०च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.अशी माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली

खासदार चव्हाण यांनी सांगितले,

महाराष्ट्रातील रखडलेली जल जीवन मिशनची कामे केंद्र आणि राज्य शासनाने समन्वयाने तातडीने पूर्ण करावीत, अशी भूमिका मांडली. कामे अपूर्ण राहिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित कामांना गती देणे, अडथळे दूर करणे आणि नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विविध सूचना मांडल्या.

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, महाराष्ट्रातील खासदार तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande