रियाज खान लतीफ खान यांची शिवसेना उबाठाच्या पाथरी शहरप्रमुखपदी नियुक्ती
परभणी, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाथरी शहरप्रमुखपदी रियाज खान लतीफ खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर पाथरी शहरातील संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे. रियाज खान हे शिवसेना पदाधिकारी वाहेद खान या
पाथरी शिवसेना शहरप्रमुखपदी रियाज खान


परभणी, १३ ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाथरी शहरप्रमुखपदी रियाज खान लतीफ खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर पाथरी शहरातील संघटनात्मक जबाबदारी सोपविली आहे.

रियाज खान हे शिवसेना पदाधिकारी वाहेद खान यांचे धाकटे बंधू आहेत. पाथरी शहरातील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबरोबरच शिवसेनेची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे रियाज खान यांनी यावेळी सांगितले.या नियुक्तीनिमित्त पाथरी येथील रेस्ट हाऊस येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे आणि उपजिल्हाप्रमुख मुंजाजी कोल्हे पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त शहरप्रमुख रियाज खान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पाथरी शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे तसेच पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande