राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मूल्य साखळी भागीदार म्हणून एफपीसीची निवड
परभणी, 13 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन व करडई या पिकांसाठी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिकनिहाय मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मूल्य साखळी भागीदार म्हणून एफपीसीची निवड


परभणी, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत सोयाबीन व करडई या पिकांसाठी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिकनिहाय मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात येणार आहे.अभियानांतर्गत जिल्हा तेलबिया समितीने निवड केलेल्या मूल्य साखळी भागीदारांमार्फत शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी शेतीशाळा आदी विविध घटक राबविण्यात येणार आहेत. यासाठी परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत.पात्रता निकष कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत संस्थेची नोंदणी झालेली असावी. संबंधित जिल्ह्यात काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्यासाठी संस्थेची नोंदणी मार्च २०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थेमध्ये किमान २०० शेतकरी सभासद नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकांबाबत कामकाजाचा उल्लेख असावा.मागील तीन वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल ₹९ लाखांपेक्षा अधिक असावी. तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान ₹३ लाखांचा समभाग असणे आवश्यक आहे. शासन अनुदानित शेतकरी उत्पादक कंपनी अथवा सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येईल.उपरोक्त निकष पूर्ण करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, दौलत चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande