बीड - माजलगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावणोत्सवाची पर्वणी
बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.) माजलगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावणोत्सवाची पर्वणी; विशेष शृंगार, रुद्राभिषेक, कीर्तन, शिवलीलामृत अन् शिवमहापुराणाचा भक्तिमय जागर होणार आहे माजलगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त विवि
अ


बीड, 13 ऑगस्ट (हिं.स.) माजलगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावणोत्सवाची पर्वणी; विशेष शृंगार, रुद्राभिषेक, कीर्तन, शिवलीलामृत अन् शिवमहापुराणाचा भक्तिमय जागर होणार आहे माजलगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील चारही सोमवार विशेष शृंगार पूजा, रुद्राभिषेक, अखंड नामजप, कीर्तन महोत्सव, सामूहिक शिवलीलामृत पारायण तसेच संपूर्ण श्रावण मास शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी भक्तीची पर्वणी उपलब्ध होणार आहे.

श्रावणातील पहिल्या सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी सहस्र बिल्वार्चन व ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. २४ ऑगस्ट रोजी दुसऱ्या सोमवारी भस्मार्चन, अमरनाथ बाबा बर्फानी शृंगार तसेच सहस्र लाडू भोग नैवेद्य होणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या सोमवारी सहस्र कमळ पुष्पार्चन व पंचपक्वान्न नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. तर ७ सप्टेंबर रोजी चौथ्या सोमवारी सहस्र मंदार पुष्पार्चन, रुद्राक्ष महोत्सव व जलविहार शृंगार करण्यात येणार आहे.

चारही सोमवारी कीर्तन महोत्सव

श्रावणातील चारही सोमवार सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सांप्रदायिक कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ह.भ.प. ओम महाराज खोत, ह.भ.प. सोपान महाराज इदगे, ह.भ.प. मल्हार महाराज शेळगावकर तसेच श्री महंत गौरी शंकर गिरी देवगिरी महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे.

मासिक शिवरात्रीला विशेष भस्म आरती

९ सप्टेंबर रोजी श्रावण मासिक शिवरात्रीनिमित्त भगवंताची विशेष भस्म आरती करण्यात येणार आहे. तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी सूर्योदय ते सूर्यास्त अखंड रुद्राभिषेक व अखंड नामजप सेवा सुरू राहणार आहे.

सामूहिक शिवलीलामृत पारायण

२२, २३ व २४ ऑगस्ट रोजी मंदिरात सामूहिक शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण श्रावण मास शिवमहापुराण कथा संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात पद्माकर देवा कुलकर्णी यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कथा होणार आहे. याशिवाय दररोज रात्री ९ वाजता नित्य शृंगार आरती होणार आहे.

श्रावण महिन्यानिमित्त आयोजित या सर्व धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व भगवंताच्या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन सुकाणू समिती, श्री सिद्धेश्वर भक्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande