‘SHe-Box’ पोर्टलवर समितीची १५ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी; प्रशासनाचे आवाहन
नाशिक, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण व त्याचे प्रतिबंध करण्यासाठी लागू असलेल्या महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स
‘SHe-Box’ पोर्टलवर समितीची १५ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी; प्रशासनाचे आवाहन


नाशिक, 13 ऑगस्ट, (हिं.स.)। कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण व त्याचे प्रतिबंध करण्यासाठी लागू असलेल्या महिलांचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, खासगी आस्थापना, उद्योग, व्यावसायिक, शैक्षणिक व इतर संस्थांनी अंतर्गत समिती स्थापन करून तिची नोंदणी ‘SHe-Box’ पोर्टलवर १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे तसेच लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी POSH Act मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व आस्थापनांनी अंतर्गत समितीची स्थापना करून तिची माहिती SHe-Box पोर्टलवर नोंदवावी. तसेच अंतर्गत समितीचा फलक कामाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावून अधिनियमातील सर्व तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांच्या मदतीसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक १८१ वर सुविधा उपलब्ध आहे.

विहित मुदतीत अधिनियमातील तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध POSH Act, 2013 मधील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. यामध्ये रुपये ५० हजारांपर्यंत दंड तसेच इतर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे सर्व संबंधित आस्थापनांनी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी . प्रसाद यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande