
अमरावती, 13 ऑगस्ट, (हिं.स.) - घर तिरंगा अभियानाअंतर्गत आ प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
भाजपा , भाजयुमो, भाजपा महिला आघाडी च्या वतीने‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत आज शहरात बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. ही रॅली दत्तापूर येथून निघाल्यानंतर कॉटर मार्केट चौक अमर शहीद भगतसिंग चौक गांधी चौक मेन लाईन शास्त्री चौक शिवाजी चौक येथे आली. स्वतः बाईक चालवित आमदार प्रतापदादा अडसड यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीत धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे, नगराध्यक्ष डॉ अर्चनाताई अडसड रोठे, उपाध्यक्ष गिरीष मुंदडा, नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकीसह या रॅलीत सहभाग घेतला होता .
डॉ. मुकुंदराव पवार सैनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करीत हातात राष्ट्रध्वज घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना आ प्रतापदादा अडसड यानी अभिवादन केले. मेरा रंग दे बसंती चोला हे गीत अमर शहीद भगतसिंग चौकात आ. प्रतापदादा अडसड यांनी सादर केले. यावेळी देश की रक्षा कोण करेंगे - हम करेंगे हम करेंगे, भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.‘हर घर तिरंगा’सोबतच राष्ट्रीय एकात्मता जोपासत प्रत्येक नागरिकाने हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपले कर्तव्य लक्षात ठेवावे, असे आवाहन आ प्रतापदादा अडसड यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी