‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नांदेडमध्ये भव्य तिरंगा रॅली!
नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाली. शासकीय तंत्रनिकेतन चौक येथून महापौर सौ. कविता संतोष मुळे व मनप
अ


नांदेड, 13 ऑगस्ट (हिं.स.)।

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची भव्य तिरंगा रॅली उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाली.

शासकीय तंत्रनिकेतन चौक येथून महापौर सौ. कविता संतोष मुळे व मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, शिक्षण, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.

मनपा शाळांसह शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

“तिरंगा ही आपली राष्ट्रीय अस्मिता आहे. प्रत्येक घरावर सन्मानाने तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे,” असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विभाग, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, वाहतूक पोलीस प्रशासन व मनपा कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande