
लातूर, 13 ऑगस्ट (हिं.स.)।
: ब्राम्हण समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून लातूर शहरातील विद्यावर्धिनी प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २५ विद्यार्थांना ७ लाख रुपयांची शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आजतागायत या संस्थेकडून गेल्या ८ वर्षात १६५ विद्यार्थ्यांना २० लाख रुपयांची मदत करण्यात आली आज झालेल्या कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर येथील रुद्रानि इन्फ्रास्ट्रक्चर चे चेअरमन विवेक देशपांडे हे होते तर अध्यक्षस्थानी
जेष्ठ नेत्र चिकित्सालय डॉ राम पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वास कुलकर्णी, नूतन अध्यक्ष डॉ महेश उगले सचिव डॉ रवी पोरे डॉ संतोष देशपांडे, डॉ श्रीनिवास संदीकर, डॉ अमित उटीकर डॉ नितीन सातपूरकर अँड संजय पांडे उपस्थित होते.
विद्यावर्धिनी शहरातील प्रतिष्ठानकडून ब्राम्हण समाजातील होतकरू व आर्थिकदृष्ट्या कमकुवत व हुशार असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत असून गेल्या ८ वर्षात १६५ विद्यार्थ्यांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून यावर्षी आजच्या कार्यक्रमांत २५ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपये शैक्षणिक मदत केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis